जुन्या गोष्टी आठवायला लागल्या, वर्षभरापूर्वीच्याच का असेनात, आठवणी तयार झाल्या वगैरे म्हणायला ठिके, पण म्हणजे जुने झालो की काय आपण एकमेकांसाठी !
शपथा वगैरे न घेता, बरे टिकलो नै सोबत?
फेअर इनफ.
मला ना असं कधीही वाटतं की हळूहळू आपलं बोलणं थांबेल, आपण भेटायचा आळस करू, बोअर होईल तेच तेच बोलून, आत्ता वेळ काढू शकणारे आपण तेव्हा खूप बिझी होऊन जाऊ.
आणि असंही वाटतं की असं होणं शक्य नाही.
आत्ता कुठे हळूहळू जशी आहे तशी वागायला लागलीय मी माहितीय? तू आलास घरी तरी मग गबाळ्या कपड्यात वावरू शकते मी, आता चालवून घेतोस तू हे कळलंय.
आता राग आला तुझा की हलकट आहेस तू, असं बोलून मोकळी होते मी. काही का वाटेना तुला.
मला ही बेफिकिरी आवडायला लागलीय.
परवा बघ, चहा करायला सांगितलास, मला माहित नव्हतं, तुला माझ्याच सारखा चहा चालतो कधीही..!
भारी अरे, मला चहा एकदम मस्त जमतो. गोड कडक गरम चहा. बिस्किटं बुडवून. ही अशी बुडवायची मजा कॉफीत येत नाही की नै? आपण आपले इतके दिवस उगीचच कॉफीचे भक्त होतो.
तर हे कळायला दीड वर्ष जावं लागलं.
म्हणजे अशा अजून भरपूर गोष्टी राहिल्या आहेत रे कळायच्या. हां, पण त्या कळल्याच पाहिजेत अशी सक्ती अजिबात नाही.
कळल्या- नाही कळल्या तरी तू तोच राहणार ना?
असाच वागणार ना? पंधरा वीस मिनिटं सांगून अर्धा तास उशिरा येणार ना? मी दमलोय, इतक्या लांब येणार नाही असं सांगणारच; हे गाणं डाउनलोड करून दे, ह्याचा नंबर पाठव, तिला ते विचार, नेटपॅक संपलाय जरा रिचार्ज कर, असं कामाला लावणारच. सवय झाली अरे आता.
आजकाल तूच सारखा म्हणत असतोस, "सवय झालीय तुझी, सवय झालीय तुझी.."
हे ऐकायला मस्त वाटतं खूप, आणि पुढचं वाक्य ऐकलं, "मोडायला अवघड जाईल" की तुटतं कुठेतरी. खड्डा पडतो पोटात. ह्या असल्या तुटाय-बिटायच्या गोष्टी कशाला करायच्या ?
आहोत ना एकत्र? भांडत नाही ना आपण? तू तुझा हक्क गाजवतोस ना व्यवस्थित? मला चालतं ना ते? ऐकते ना मी तू सांगतोस ते?
झालं तर मग.
सगळ्याच सवयी मोडायला पाहिजेत, असं काही नाही.