I want ours....
किती सोप्पे शब्द होते माझे, तरी त्यावर "whattttt" करायला काय झालं तुला? इतकं काही surprise होण्यासारखं नव्हतं. तुला कळतंय मी कशाबद्दल बोलतीय ते. "बोलून दाखवलं" म्हणून आश्चर्य वाटलं का?
मला ना एक शंका आहे; संशय म्हणलास तरी चालेल. मी "अगम्य" भाषेत बोलते, बऱ्याच गोष्टी माझ्यापाशी ठेवते असं तू म्हणत असलास तरी ते तुला कळत असतं बरोब्बर.
उगीचच नाही नऊ पावसाळे जास्त पाहिलेस तू. तरीही...
"नक्की काय म्हणायचंय तुला? Please elaborate.."
हे असं अजून काही वेळ ताणलं की मग मी कंटाळून विषय सोडून देते, पण विसरत नाही.
विसरत तू देखील नाहीस. दोन दिवसांनी तूच विषय छेडतोस.
" तू काय ग म्हणत होतीस त्या दिवशी?"
जसं काही आठवत नाहीये तुला? माहिती नाहीये? कळत नाहीये?
खरं तर विषय काढल्याबद्दल "तुम्हे याद है तुम्हे याद है" असं वाटून मी मनातल्या मनात चारपाच उड्या मारते. पण ते तेवढ़यापुरतंच.
कारण मग पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा. असं मग काही आगा-पिछा नसताना अचानक बोलता येत नै.
"काही नाही" उत्तर मग पटत नाही तुला.
"Sure? Nothing??"
हे असं विचारलंस की मग वितळते मी.
तू जे "whaatttt" करून विचारतोस न, जे मी चुकून बोलून गेलेली असते, त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात.
एकटेपणाशी लढून हार मानलेली असते, तुझ्या विचारांतून बाहेर यायला स्वतःला उसंत दिलेली नसते, फिरून फिरून तिथेच येते मी; आणि मग असं काहीतरी निसटून जातं माझ्याही नकळत. कितीतरी इच्छा पुरुन टाकल्या आहेत मी, त्या मधूनच डोकं वर काढ़तात.
खरोखर कळत नसतं तुला, तर समजावलं असतं हजार वेळा; पण समजत नसल्याचं सोंग घेतल्यावर किती लढणार ना मी?
शिवाय बोलून बसल्याचा पश्चाताप होतच असतो. विचारल्यावर मग मी उड़ती उत्तरं देते; तशा सारवासारवीला काही अर्थ नसतो. मीच कायम माझे पत्ते खुले करते. आणि तू ?
"Let the suspense continue"
हरकत नाही, suspense तर suspense.. यहाँ पे किसको जल्दी है, नतीजेपर पोहोचनेकी?
पण असं किती वेळ किती दिवस आजमावत राहायचं एकमेकांना?
असंच वागणार असशील तर मग असे "whattttt" करायचे बरेच प्रसंग येतील, हे नक्की. तुला कळतंच असं गृहीत धरते मी. Elaborate करणार नाही.
" i want ours" म्हणण्यामागे, तू आणि मी असा वेगवेगळा विचार नव्हता. "आपण" होतो. दोघं. एकत्र.
दोघांसाठीचं एकत्र असं काहीतरी मागते आहे मी.
ते नेमकं काय, हा suspense च ठेवायचा असेल तर ठेवू तसाच.