Sunday, 6 December 2015

रूमानी

तुला माहितीय, मी नेहमीच तुझ्याआधी भानावर येते; तू तसाच असतोस, डोळे मिटून पडलेला, जरासा थकलेला.
मला ना नेमक्या त्याच वेळी भरपूर बोलायचं असतं. काहीही मनात येईल ते, अविरत. पण त्या पसरलेल्या मऊ शांततेला आता स्पर्शही करावासा वाटत नसतो. मी तशीच पडून राहते. निःशब्द.
झोप तर लागतच नाही मला, मग मी उगिचच कुठे उशा नीट करते. रजई अंगावर ओढते.
काळवेळाचे संदर्भ सापडत नाहीत. खिड़कीबाहेर पाहून मी अंदाज करते, की साडेचार वाजले असावेत. ढगाळ पावसाळी वातावरण. अशा वेळेला आवडतो हां सेपिया मोड.

हलके हलके पुसट होत जाणाऱ्या खुणा शोधते मी कुठेकुठे.. खांद्यावर दात रुतलेला दिसतो आणि एखाद नखाचा ओरखडा.
कड़कडीत चावलेले  अजूनही ओलसर ओठ.
तुझी आरपार जाणारी आणि अंगावर परत परत शेकडो काटे उभे करणारी नजर. कढ़त स्पर्शाचे कढ़त प्रश्न आणि त्याला तेवढीच धगधगती उत्तरं. धपापते श्वास आता विलम्बित लय पकड़तात.

तुझ्या तळहाता वरच्या रेषा पाहते मी.
लिहिलय का त्यात की, आपण आज इथे असे भेटू? रूमानी होउ? असे सुखवू एकमेकांना?

अशा गुंगीत ज़रा कुठे डोळा लागणार असं वाटेपर्यन्त तुला जाग येते. उठल्यावर आधी हातात मोबाइल येतो. वाजलेत सव्वापाच.. "खूपच" असं म्हणून घाईनी कपडे चढ़वतोस.

तुझी घाई पाहून मी पण आवरतेच् मग. विस्कटलेले केस नीट करते. रजईत अडकलेलं इयरिंग सोडवते. आयलायनर एव्हाना फिका पडलेला असतो, तो पुसूनच टाकते पूर्ण.

मला वाटतं तेव्हा अनेकदा, की परत मिठीत यावं तुझ्या, डोळे मिटून थांबावं काही क्षण. गुरफटून जावं. परत थोडीशी ऊब मिळावी.

मगाशी कट केलेले अनेक कॉल्स आणि बायकोचे मेसेज सांगत असतात की आज तुला मुलाला पिकअप करायला जायचंय.

तू माझा नाहीस ह्या वेदनेपेक्षाही अधिक खोलवर रुतलेलं असं काहीतरी घेऊन, मीही निघते तिथून.

Tuesday, 3 November 2015

Contract

अशी काय वागतेस ग?

प्रश्न इतकाच होता तरी त्या मागचे
strange weird irrational असे शब्द मला वाचता आले.

आता काय वाईट वाटत नाही हाँ मला.
कारण असं पट्टीनी रिलेशन आखता थोडीच् येतं?
हे असं असंच बोलायचं, ह्या गोष्टीवर वाद घालायचा नाही, ते सोडून द्यायचं, आणि तो विषय तर अजिबात ताणायचा नाही.
चौकटीत बसवल्याप्रमाणे वागायचं.
हे म्हणजे सध्या तू खातोस तसलं घास-फूसच झालं की. कसला मसाला नाही की तर्री नाही. मला हे असं मेणचट वाटतं सगळं. ना आकार उकार, ना कुठली चव.
"its okay, no problem, i can understand" अशी नाटकं मी फार काळ नाही करू शकत. मग "stupidity" डोकं वर काढ़ते ती अशी.

इतकं बोलतोस, तरी मला माहीत आहे की तसा बरा आहेस तू. मनात काही ठेवत नाहीस. असं सारखं सारखं तू मला सूचना देण्यापेक्षा, बघ कसं वाटतंय, रिश्ता निभाने के सौ तरीके' च्या धर्तीवर आपण " behaviour contract" तयार करुया का?

जिथे एखाद्या (माझ्यासाठी emotional, so romantic)
प्रश्नाचं__जो प्रश्न तुझ्यासाठी मुर्ख आणि impractical असतो__ त्याचं  "काय सांगतेस!!!" इतकं कंटाळवाणं उत्तर असू शकत नाही;
Reply करायला अर्ध्या दिवसापेक्षा जास्त वेळ झाला तर पेनल्टी लावण्यात येईल; शिवाय मस्का मारायला "her highness" आणि राणी हे शब्द banned आहेत.

बाकी क्लॉजेस आपण दोघं मिळून ठरवू. या बाबतीत माझी मनमानी करणार नाही मी. तुला बरोबरीचा चान्स असेल.

तुला हीच भाषा कळते ना? व्यावहारिक? With due respect to all the manners, rules and regulations?

मी मात्र चंद्र_तारे, नक्षत्रांनी जोडलेली नाती, अशा कुठल्याही कल्पना सोबत घेऊन जगते. स्वतःच्याच् विश्वात मग्न पण बराचसा आनंद तुझ्यावर अवलंबून असणारी.

आता काय करू ह्याचं, वाल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर सापडल्याच्या खुशीत मी होते, तुला बऱ्यापैकी पटवलं सुद्धा
तेवढ्यात
" sure, i will just consult my lawyer first" असं बोलून ते नवं कोरं करकरीत उत्तर टरकावून टाकलंस तू.

Friday, 30 October 2015

जन्मदिन मुबारक !

बर्थडे स्पेशलच असला पाहीजे.
कौतुकाचा. मिरवण्याचा. साजरा करायचा. तोच दिवस जो की कधी संपूच नये असं वाटतं.


मी लहान असताना, आई वाढदिवसाच्या दिवशी मला औक्षण करायची. ओवाळून घ्यायचं, सगळ्यांना नमस्कार करायचा आणि मग  वाढदिवसाचे म्हणून पैसे मिळायचे ते देखील मिंटीमधे टाकायला. शाळेत असताना वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला यूनिफॉर्मला सुट्टी द्यायची परवानगी होती. मग त्या दिवशी वेगळा ड्रेस घालून जायचं. की आपोआपच कळायचं सगळ्यांना. पुढे कॉलेजमधे गेल्यावर बड्डे बम्प्स मिळायला लागले, शिवाय तो केक तोंडाला फासायचा.
निवडक मित्र मैत्रिणींना पार्टी द्यायची. "कॉंट्री" काढून जमवलेल्या पैशातलं गिफ्ट मिळायचं.


ज्याचा बड्डे असतो न, त्याचे भरपूर लाड झाले पाहिजेत असं मला नेहमीच वाटतं.
"आता काय लहान आहोत का आपण?"
असे प्रश्न वाढदिवशी गैरलागू आहेत. "वय तर वाढणारच, त्यात काय आहे साजरं  करण्यासारखं?"
असे उदास विचार निदान त्या दिवशी तरी करू नयेत.

मला तर अजूनही आवडेल फुगे, केक, मेणबत्या, नविन ड्रेस, फुलं, भरपूर चोकोलेट्स अशा गोष्टींनी नटलेला दिवस.
काही विशेष सरप्राइज गाठीभेटी आणि डोळ्यांच्या कडेला आलेलं पाणी. मनापासून दिलेल्या शुभेच्छा. आवडीनिवडी लक्षात ठेऊन दिलेली गिफ्ट्स. ख़ास माणसांसोबतचे ख़ास फ़ोटो; " special midnight wishes आणि त्यासाठी गुपचुप ठरवलेली sleepovers;  एरवी कधीतरी होणारा दुर्मिळ फ़ोन, यादिवशी तासभर चालला पाहिजे. आजकाल ट्रेंड आहे तसा "जन्मदिन मुबारक"वाला बॅनर लागला आपल्या वॉलवर, तर काय विचारायलाच नको! भरपूर धामधूम् असली पाहिजे दिवसभर. मनासारखं आणि लक्षात राहण्याजोगं घडलं पाहिजे सगळं त्या दिवशी.

तुझ्या B'Day साठी अशीच धडपड केलीे मी आज. ते सगळं जमवताना माझा वाढदिवस आठवला. किती pampering केलंस माझं, सरप्राइजेस दिलीस; प्रचंड खुश झाले होते मी, आणि आठवून अजूनही मस्त वाटतं.

तू इतकं दिलंस, इतकं केलंस म्हणून मग मी मागे कशी राहणार, अशी स्पर्धा नाहीये. बरोबरकी तर त्याहुन नाही.
फक्त तू खुश व्हायला हवास, you should feel delighted, तुझे लाड करायचा अजून चांगला मौक़ा कुठला मिळणार!

गिफ्ट हां इतका जिव्हाळ्याचा विषय आहे न, आणि मला स्वतःला त्यात इनवॉल्व व्हायला खूप आवडतं.

असं उचलून पैसे देणं हे फार अरसिक वाटतं. पैसे देऊन स्वतःसाठी खरेदी तर तशीही करशील तू कधीही. पण मला द्यावसं वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, नै का?

आत्ताचंच पाहा, तुझ्या गिफ्टचा केव्हापासून विचार करते आहे मी. त्या निमित्तानि हजार वेळा तुझ्या आवडी-निवडीची उजळणी केली.  गिफ्ट उघडल्यावर तुला काय वाटेल, आवडेल_नाही आवडेल, याची कल्पना करून पाहिली. गिफ्टस बघितल्यावर डोळे चमकतील तुझे, आणि मग तो आनंद बघितल्यावर अशी धडपड केल्याचं सार्थक वाटेल मला.

गिफ्ट तर फ़क्त निमित्त होतं, बाकी शुभेच्छा तर आहेतच आणि त्या कायमच असतील.

फ़क्त वय वाढलं नाही; तर सोबत आठवणीमधे अजून एक सुंदर वर्ष देऊन गेलं तुला. तुझ्याच शब्दात बोलायचं तर,  अभी तो लाइफ शुरू हुई है !
असे कितीतरी येणारे वाढदिवस असतील यापुढे, जे की आपण एकत्र "सेलिब्रेट" करू. यादगार बनवु.

सो, दाढ़ी कुरवाळत वय वाढल्याचा जो काय विचार करत होतास; तो सोडून दे; भले आता डोकवत असेल एखादा चुकार पांढरा केस, पण बघ, अजून देखणा दिसायला लागलाएस तू!



Thursday, 8 October 2015

बाकी सगळं तुझंच

आजकाल ना मला कसली कसली स्वप्न पडतात. स्वप्नात मी हवेत तरंगत असते, एकदम हलकीफूल होउन, मखमली पंख मिळतात मला. सुखावणारा वारा असतो, हवा जिकडे नेईल तिकडे उडत जाते.

स्वप्नाचा काय अर्थ असेल तो असेल. चांगलाच असेल. मला सांगायचंय असं की मी आता खुश असते ना स्वतःवर. Happy contended वगैरे.

हे व्हायला लागलं ह्या जेमतेम सात आठ महिन्यांच्या अवधित. रूढ़ार्थानी प्रेमात न पडल्यामुळे पछाड़ल्यासारखं नाहीच झालं कधी. खरंच सांगते, सुरुवातीला चाहूलसुध्दा नव्हती मला.

त्यामुळे तुझ्या प्रेमात पडल्याचं कळलं तेव्हा ती माझ्यासाठीसुद्धा breaking news च होती.
पाहुया काय होतंय, असा बेफ़िकीर विचार होता. पण नंतर शहाणपण सुचलंच नाही. 'कंट्रोल' मधे राहिलंच नाही काही.

हलक्या पावलांनी आलास आणि भिनतच गेलास. तुझा आवाज, स्पर्श, गंध, नजर, शब्द सगळं सगळं सामावलं जातंय हळूवार. अतिशयोक्ति वाटते तुला?

अगदी आयुष्य नाही पण मी नक्कीच बदलले आहे. तुझ्यामुळे. तुला जाणवतं का हे? अशी जमिनीपासून चार बोटं वर तरंगत असते ते तुझ्यामुळेच. कुठलीही नशा न करता! अलवार माझ्याही नकळत.
हे सगळं खरं घडतंय की स्वप्न पाहतिय मी?
उगीच नाही हळवी होत मी हे सगळं सांगताना. वाटतं याआधी का नाही भेटलास तू? कुठे होतास? नुसती ओळखत होते मी तुला, पाहिलं होतं अनेकदा, पण "click" व्हायला पाच वर्ष जावी लागली. तब्बल पाच! तेदेखिल तू पुढाकार घेतल्यावर!

मला कळत नाही ते हेच. तू उशिरा भेटलास मला म्हणून अफ़सोस करू की भले उशिरा का होईना पण आयुष्यात आलास माझ्या याबद्दल "हरकत नाही" मोड वर जाऊ?

असंही वाटतं कधीकधी की आत्ता उशिरा भेटलास तेच बरं झालं ना, कारण आपण भेटलो तोपर्यन्त आपली आयुष्य मार्गी लागली होती.  तू 'माझा' होण्याची दूरपर्यन्त शक्यता नाही त्यामुळे तुला गमवायची भीतीदेखील नाही.
म्हणून अफ़सोस नाही, उलट स्वतःचंच कौतुक करून घ्यावं म्हणते. तुझ्याबरोबर इथपर्यन्त आल्याचं कौतुक. एकदम बड़ी बात!

तुझं नाव त्या दिवशी लिहिताना, कशाला डोक्यात आलं असतं की याच्यामुळे माझं आयुष्य बदलणार आहे. किती वेळा लिहिलं, गिरवलं, उच्चारलं. तुझ्याबद्दलच्या ऐकिव गोष्टींची उजळणी केली. तू कसा असशील याबाबत अंदाज बांधले.

तुझ्याभोवती घुटमळले, बेहकले, हरवून गेले आणि नव्यानी सापडलेसुद्धा. कितीतरी आढेवेढे, विनावण्या, हरकती आणि समजूती.. इतकं झगडून शरण येऊन माझं काही उरलंच नाहीये.

कविकल्पना आहे ना "मी न माझी राहिले " types. खरी असणार ती.
काही राहिलं असेलच माझं, तर तो वेडेपणा तेवढा माझा असेल. बाकी सगळं तुझंच.

Thursday, 24 September 2015

Suspense

I want ours....
किती सोप्पे शब्द होते माझे, तरी त्यावर "whattttt" करायला काय झालं तुला? इतकं काही surprise होण्यासारखं नव्हतं. तुला कळतंय मी कशाबद्दल बोलतीय ते. "बोलून दाखवलं" म्हणून आश्चर्य वाटलं का?

मला ना एक शंका आहे; संशय म्हणलास तरी चालेल. मी "अगम्य" भाषेत बोलते, बऱ्याच गोष्टी  माझ्यापाशी ठेवते असं तू म्हणत असलास तरी ते तुला कळत असतं बरोब्बर.

उगीचच नाही नऊ पावसाळे जास्त पाहिलेस तू. तरीही...
"नक्की काय म्हणायचंय तुला? Please elaborate.."

हे असं अजून काही वेळ ताणलं की मग मी कंटाळून विषय सोडून देते, पण विसरत नाही.

विसरत तू देखील नाहीस. दोन दिवसांनी तूच विषय छेडतोस.
" तू काय ग म्हणत होतीस त्या दिवशी?"

जसं काही आठवत नाहीये तुला? माहिती नाहीये? कळत नाहीये?

खरं तर विषय काढल्याबद्दल "तुम्हे याद है तुम्हे याद है" असं वाटून मी मनातल्या मनात चारपाच उड्या मारते. पण ते तेवढ़यापुरतंच.
कारण मग पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा. असं मग काही आगा-पिछा नसताना अचानक बोलता येत नै.

"काही नाही" उत्तर मग पटत नाही तुला.
"Sure? Nothing??"
हे असं विचारलंस की मग वितळते मी.

तू जे "whaatttt" करून विचारतोस न, जे मी चुकून बोलून गेलेली असते, त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात.
एकटेपणाशी लढून हार मानलेली असते, तुझ्या विचारांतून बाहेर यायला स्वतःला उसंत दिलेली नसते, फिरून फिरून तिथेच येते मी; आणि मग असं काहीतरी निसटून जातं माझ्याही नकळत. कितीतरी इच्छा पुरुन टाकल्या आहेत मी, त्या मधूनच डोकं वर काढ़तात.

खरोखर कळत नसतं तुला, तर समजावलं असतं हजार वेळा; पण समजत नसल्याचं सोंग घेतल्यावर किती लढणार ना मी?

शिवाय बोलून बसल्याचा पश्चाताप होतच असतो. विचारल्यावर मग मी उड़ती उत्तरं देते; तशा सारवासारवीला काही अर्थ नसतो. मीच कायम माझे पत्ते खुले करते. आणि तू ?
"Let the suspense continue"

हरकत नाही, suspense तर suspense.. यहाँ पे किसको जल्दी है, नतीजेपर पोहोचनेकी?
पण असं किती वेळ किती दिवस आजमावत राहायचं एकमेकांना?
असंच वागणार असशील तर मग असे "whattttt" करायचे बरेच प्रसंग येतील, हे नक्की. तुला कळतंच असं गृहीत धरते मी. Elaborate करणार नाही.
"  i want ours" म्हणण्यामागे, तू आणि मी असा वेगवेगळा विचार नव्हता. "आपण" होतो. दोघं. एकत्र.

दोघांसाठीचं एकत्र असं काहीतरी मागते आहे मी.
ते नेमकं काय, हा suspense च ठेवायचा असेल तर ठेवू तसाच.

Tuesday, 22 September 2015

Superlatives.

एकदा टीव्हीवर बिपाशाचा इंटरव्यू पहात होते. ती आणि जॉन एकत्र होते त्या काळातला. बरंच आधी. तेव्हाचं तिचं एक वाक्य माझ्या अजून लक्षात आहे.
" त्याचं माझ्याकडे इतकं लक्ष असतं की माझ्या eyebrows चा आकार जरासा जरी बदलला तरी त्याच्या लगेच लक्षात येतं"

त्यांची गोष्ट सोडून देऊ, पण परवा शनिवारच्या आपल्या "ताज विवान्ता" डेटच्या आधी; when i got the "to do" list on Thursday night, मला तो इंटरव्यू आठवला लगेचच. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्यात सांगितल्या होत्यास तू,
Which dress I suppose to wear, with accessories, purse, stilettos etc etc... (well these are not small things frankly !)

वाटलं, तू पण असाच आहेस की काय?

माझ्या मैत्रिणींच्या बॉयफ्रेंडस बद्दल मी याआधी ऐकायचे ना; तो सांगणार आणि ही ऐकणार लगेच.
" weird" वाटायचं असं वागणं. त्या दोघांनाही वेड्यात काढायचे. कुणी "फार" लक्ष घालतंय, असं कर तसं कर सांगतंय म्हणजे dominance वाटायचा.
आणि आता तू आहेस माझ्यापाशी तर  "I let you do it"

No wonder that day you told me, as we were to go on a date, पण प्रत्येक वेळीच तू मला अनेक गोष्टींची आठवण करून देतोस
आणि त्यात एक गर्भित इशारा देखील असतो,
"As I know all these things, you better be on your toes"

त्यामुळे तुला भेटताना गाफिल राहून चालतच नाही मला. You always notice even the minutest detail.

तर, सांगायचंय असं की तू सांगितल्याप्रमाणे सगळं फॉलो केलं जसं तुला हवं होतं तसं (!) आणि विवान्ताची डेट मस्तच झाली.

A brilliantly planned one. It was a beautiful day with a dazzling weather. Exquisite and cozy place. All the Adoration and everything you did only to pamper me! That precious #GoldRing you gifted me, n that "wow" feeling !
Your vivacious presence made it the way more romantic!

I still couldn't fixed it, what was the thing which made it super exciting?
I think it was our superb chemistry. Whatever !


The most beautiful Birthday celebration I have ever had.

Look at these superlatives.. its you !!!

Friday, 18 September 2015

Butterflies

शांत संथ आयुष्य होतं तेव्हाच्या दिवसातली ही गोष्ट आहे.
इतर अनेक दिवसांसारखे दिवस उजाडायचे आणि जसेच्या तसे संपायचे.
आजकालच्या सीरियल्स असतात ना, पुढेच सरकत नाहीत; कुठलाही एपिसोड पाहिला तरी गोष्ट तिथेच घुटमळते; तसंच काहीसं तेव्हा माझ्या आयुष्याच्ं होतं.
फारसं लक्षात ठेवण्यासारखं काही घडत नव्हतं आणि तसं घडायची काही गुंजाईश पण नव्हती; आणि तू भेटलास मला.

लख्ख आठवतो आपण भेटलो तो दिवस.
8th of January. Thursday.
मुद्दामून लक्षात ठेवला नव्हता; लक्षात राहीलाय.

भेटल्याच्या दिवशी आजच्या काळाला अनुसरुन केलेली अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे; we exchanged our cell numbers.
Haha..let me correct it; you asked for it first.

माहितीय की तू ठरवून काही केलं नाहीस. पण आज संगती लावायचा प्रयत्न करते तेव्हा दरवेळेला काहीतरी नवीन लक्षात येईल असं वाटतं.

तू अतिशय "irrelevant" प्रश्न विचारले होतेस मला; आणि उत्तरं देताना मला तुझं आणि स्वतःचं देखील भयंकर आश्चर्य वाटलं होतं.
कुठेतरी तुझ्या डोळ्यातली उत्सुकता सुद्धा जाणवली होती; जी की तुझ्याकडून अजिबातच अपेक्षित नव्हती.
तेव्हाचे "irrelevant" प्रश्न हे बोलणं पुढे नेण्यासाठी असणार. एरवी त्या तशा प्रश्नांची उत्तरं मी कुणालाही दिली नसती. पण तू विचारल्यावर तुला सांगितली.

As you always say, its not a puppy love. Neither it was love at first sight.
त्यामुळे असं झपाटल्यासारखं झालं नाही. ना कुठली प्रचंड उलथापालथ झाली. जरी आपण भेटलो हा एक अपघात समजला तरी, त्यापुढंचं सगळं हा मात्र अपघात नाही न. ते सगळं सोच समझकेच.

आपलं नातं ज्या तऱ्हेनी फुललं; आपण फुलवलं. जसे आपण व्यक्त झालो; गुंतलो; वाटा जुळवून घेतल्या; धीरे धीरे. आस्ते कदम.

मला ते सगळं आठवायला फार आवडतं. अगदी हळूवारपणे एकेक गोष्ट बदलत गेली. माझ्याही नकळत, माझं आयुष्य व्यापून टाकलंस खरं.

इतकं सगळं घडेल अशी पुसटशी देखील कल्पना आली नाही. No intuition at all.
तोपर्यन्त तू फ़क्त माहीत होतास मला इतर अनेक लोकांसारखाच्, आणि आज मी तुझ्याबरोबर ओळखली जाण्याची स्वप्नं पाहते.

Being with you, itself is a delicious treat for me! Enriching the beautiful relationship is cherry on the top !!

नितांतसुंदर दिवस मिळालेत मला. रंगीबेरंगी. एकदम ताजे आणि उत्साही.
इतकी आनंदी; इतकी समाधानी; कधीच नव्हते याआधी. तुझ्याबरोबर आहे म्हणून स्वतःचंच कौतुक वाटतं. खूपच जास्त स्पेशल!

Literally; Butterflies in my stomach !


Thursday, 17 September 2015

Gift

नऊ वर्षांचं अंतर ज़रा खूपच वाटतं मला. Especially when I try to keep a secret, hide something from you and plan to give you a surprise.
तुला नसेल वाटत आता surprise
मधे काही गंमत; पण मला वाटते ना अजून.
असं सरप्राइज प्लॅन केल्यावर मलाच भारी वाटत असतं तेव्हा
कसा पाहतोस तेव्हा माझ्याकडे.
"उरक आता हा बालिशपणा" अशा अर्थानी. तू बोलून दाखवलं नाहीस तरी ते पोचलं होतं माझ्यापर्यन्त.

असुदेत. असेन मी बालिश. समजूतदार, गंभीर वगैरे व्हायचा ठेका तू घेतला आहेस न? मग मला असं वागुदेत.

तर, भरपूर उत्सुकता ताणल्यानंतर काल जेव्हा "गिफ्ट" दिलं मी तुला, तेव्हा तुझा चेहरा पाहून इतकी खटपट केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
जरी तू ते गिफ्ट काय असणार याचा अंदाज बांधला होतास (आणि तो तितकासा चुकीचादेखील नव्हता) तरीही प्रत्यक्ष हातात पडल्यावर खरंखुरं सरप्राइजच झालं की नै?

तुझीच instant reaction आठवतीय तुला?
"मी काही घेणार नाहीये हाँ, come on, you are younger to me"

पण गिफ्ट घेतल्यावर इतका हरखून गेलास तू, की आधीचा तुझा "माझ्याकडून काहीही न घ्यायचा" निश्चय विरुन गेला.

शिवाय प्रश्न लहान मोठं किंवा कोण कमावतं याचा नाहीये न पण. द्यावंसं वाटण्याचा आहे.

As I said few days back.. "want to repay"
No, thats not true. I will never be able to repay what you have given me. I would rather say, मी तुझ्या ऋणातच राहु इच्छिते.

तू तर कित्ती काय काय दिलं आहेस मला, काही मोजदादच नाही.
No no, I am not talking about that "Vero Moda" dress, or that Adidas Shoe's, म्हणजे ते तर आहेच, निः संशय!
But I want to say, that beyond all these tangible things, You have given me a lot. All the Happiness, dreams, a new perspective, attitude, hope, motivation and what not ?!

I have never taken so much interest in "gifting" anyone.. let it be anyone in my life till date.
Never invested my time, my thoughts, my money. I have always been keen on gifting something "useful";

You are an exception for everything.

The gift has no use as such, but will remain close to my heart forever.

Let it be. Hope you have liked it. I would have been happy if I got to write there on the gift itself.
I couldn't. So here i write.

"With much Love".

Monday, 7 September 2015

ओळख

"कुणी ओळख करुन दिली असती आपली तर कसे वागलो असतो रे आपण?"

"म्हणजे काय; वेगळं काय झालं असतं? तुझं माहीत नाही; मी असाच वागलो असतो."
तू ना, विचारही केला नसणार माझ्या प्रश्नाचा आणि सांगून पण टाकलंस.
असं काय काय इंटरेस्टिंग माझ्या डोक्यात येत असतं. मी खूप विचार करते म्हणून प्रश्नही खूप पडतात. हे असं डोक्यात यायला पण कारण आहे रे.

खरं तर हे चांगलं झालं आपल्या बाबतीत. कुणी ओळख "करुन" दिली नाही आपली. 
आपणच एकमेकांना माहिती झालो होतो; formal introduction अशी झालीच नाही न.

तो असाच आहे; तो असाच वागतो; त्याला हेच आवडतं/ आवडत नाही; 
अशी खबर पुरवायला कुणीही नव्हतं मधे.
असतंच कुणी असं तर चित्र कदाचित वेगळंही असतं.
आपलं बोलणं "via" झालं असतं; त्या एखाद्याच्या सांगण्यावरुन  "judge" केलं असतं आणि मग कदाचित थोडेसे गैरसमज; बराचसा परकेपणा.

तसं "ऐकून" होते मी तुझ्या बद्दल; पण मतं ठरवण्या इतकी माहिती नव्हती.

आता आपल्या दोघांच्याही कॉमन ओळखींचं असलेलं ओझं आता मी कधीच झुगारून दिलंय.
पूर्वी ऐकायचे तसं आत्तादेखिल काय काय ऐकायला मिळतं तुझ्याबद्दल आणि मी ते भरपूर एन्जॉय करते. गॉसिप कानावर पड़तं.

Your business tours, future dealings, income, memberships, meetings हया गोष्टी कळतील आपोआप मला; कळायलाच पाहिजेत असंही काही नाही. 
माझ्यासाठी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी वेगळ्याच आहेत. your dreams, preferences, fantasies, commitment हयात मला जास्त इंटरेस्ट आहे.
All these things are beyond mere introduction. केवळ ओळखीच्या पलीकडे आपण शोधायचा प्रयत्न केला, आणि बघ आज कुठे येऊन पोचलो!

तू आज असा हरेक दिवशी मला "सही" वाटतोस आणि दिवसागणिक अजून जास्त प्रेमात पड़ते मी तुझ्या. 

आपण जसे आहोत तसे आस्ते आस्ते एकमेकांना कळत गेलो; without any prejudices.

बाकी कुणाहीपेक्षा आज मी तुला थोडंसं जास्त आणि जास्त खरं ओळखते, हे नक्की.

तुझ्याशी जुळवून घ्यायला मी शिकत गेले आणि तूदेखील तुझ्या कलानी घ्यायला मला कित्ती मदत केलीस !

काय हवं आहे अजून!

Friday, 4 September 2015

Irreplaceable !

गेल्या काही दिवसात बरीच बदलले आहे मी असं उगीचच वाटतंय का मला? तुला मागच्या वेळी बोलले होते तसं, पण मुद्दामून नाही हाँ; आपोआप. तुला बोलून दाखवलं ते कदाचित एवढ़याचसाठी असणार की तसं करून मी स्वतःच्या मनाची तयारी केली. कुठेतरी खोल मनातल्या मनात काहीतरी तुटलं असणार नक्कीच. मोड़तोड़. पण ते व्हायलाच हवं होतं.
त्याशिवाय मी जागी झाले नसते.

असं झालंय का कधी तुझ्या बाबतीत? की आपण एखाद्या गोष्टीसाठी_व्यक्तिसाठी भरपूर वाट पाहतो, त्यांना कायमच "one more chance" देतो; आणि जेव्हा अपेक्षित वेळ येते; तेव्हा मात्र interest च संपलेला असतो त्यातला. कंटाळाच येतो एकदम.
असं व्हायची भीती वाटायला लागली होती मला.
आणि कंटाळले मी तुला नाही; माझ्याच वेडेपणाला.
थकले. प्रयत्न करण्याबद्दल "ना" नाही माझी. पण ते चुकीच्या दिशेनी जाणारे आहेत आणि मला काहीच हासिल होणार नाही त्यातून; हे समजलं आता.
अब सबकुछ किस्मतपे छोड़ दिया है मैंने! जो होगा वो देखा जाएगा.

मी इतकी काय वैतागलेले नसायचे आधी. तुझ्यामुळे हे झालं असं, माहितीय?
उखडलेच मी त्या दिवशी; स्वतःवरच. काय करुन घेतलंय मी स्वतःचं? सगळे माझे मूड, माझं काम; माझं timetable हे तुझ्याभोवती फिरत होतं; ज्याची की खरं म्हणजे काही गरज नव्हती. बांधून घेतलं होतं मी स्वतःला आणि मग तीच अपेक्षा तुझ्याकडून केली. निव्वळ मूर्खपणा.
मी एकीकडे आयुष्याच्या अंतापर्यन्त वगैरे एकत्र राहायच्या गोष्टी रचते आणि दुसरीकडे एक दिवसही आपलं भेटणं रद्द झालेलं सहन होत नाही मला. असं जखडून नाही ठेवायचंय मला तुला. तू जखडून घेणारच नाहीस मुळात; पण मी आपलं सांगतीय.

तूच म्हणतोस तसं, आईवडील नवरा बायको मुलं ह्या सगळ्याच्या पलीकडे एक व्यक्ति म्हणूनदेखील स्वतंत्र आयुष्य असू शकतं; असायला पाहिजे.
लक्षात नाही आलं ते.
तुला धरून ठेवायचा जितका जास्त प्रयत्न करीन तेवढं लौकर मी तुला गमाविन; हे नीटच समजलंय.

मी म्हणत होते ना त्या ह्याच self realization ची मी वाट पहात होते. ते असं तू सांगून मला कितपत समजलं असतं ज़रा शंकाच आहे.
दुरुस्त तो आ गई मैं; और देखो अभी देर भी नहीं हुई!

ही सगळी धडपड अशासाठी की तुला गमावणं आता परवडणार नाही मला. तुझी जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही; आणि हे तुलाही माहितीय म्हणून जास्त माज करतोस तू!
So; the conclusion is__  I am not going to leave you at any cost; Mr Irreplaceable !

Friday, 28 August 2015

समांतर

खूप हसले मी काल. स्वतःवर.
एकच वाक्य बोललास तू; आणि अचानक काही गोष्टी लख्ख समोर चमकल्या. एकच वाक्य पुरलं; जे की तू खूप आधिपासून सांगत आलायेस; नेहमीच सांगतोस; त्याचा "अर्थ" काल समजला.

स्वतःच्या तंद्रित राहिल्याबद्दल आश्चर्य वाटतंय. मला माहीत नव्हतं असं अजिबात नाही, पण लक्षात आल्यावर खड्डा पडला पोटात एकदम. खरंच.
नेहमीप्रमाणे मी कशी "इम्पॉसिबल" आहे; असं वाटेलच.
पण आहे हे असं आहे. असंच राहणार. तू किंवा मी दोघंही बदलणार नाही. गोष्टी जुळून येणार नाहीत. समांतरच राहणार!

किती काय काय बोलले आहे मी आत्तापर्यन्त. किती जास्त गुंतले मी तुझ्यात; काय काय ठरवलं आपण; वाट पहायची ठरली; वेळ द्यायचा ठरला.
फिजूल वाटतंय ते अचानक.

तुझं बरंय नै का? साधे सरळ हिशोब; गुंतागुंत नाही. Pretty clear about your own thoughts and actions!
नाही नाही.. sarcastically नाही बोलत मी. खरंच आहे तुझं.
जे जसं आहे ते तसंच सांगितलंस तू कायम. ती मी होते की जिला अर्थ कळलाच नाही. मी सोईस्कर (गैर) समज करून घेतले; आणि तू मजा पहात बसलास.

मला नेहमी भीती वाटायची; स्वतःचीच. जो काही "madness" आहे ना तुझ्याबद्दल; त्याची भीती. इतकं जास्त गुंतणं पण चांगलं नाही ना. पण बरं वाटलं मला; वेळेत कळलं ते चांगलं झालं. खूप जास्त अपेक्षा, स्वप्न, गृहितकं आणि false ambitions यातून बाहेर आले मी.

तुझ्यासारखं जमलं पाहिजे, असं वाटायचं आणि ते बोलून पण दाखवायचे की मी तुला. आता जमेल बहुदा. तुलाही त्रास कमी देईन; प्रश्न कमी विचारीन;
Will keep it really simple, baby !

सगळे गुंते सुटले, उत्तरं मिळाली, उद्देश् स्पष्ट झाला. मला माहितीय, तुला हे सगळं " extreme" वाटत असणार. ते तसं आहेच. पण ओसरेल आता हळूहळू. थोड़ा वेळ लागेल, पण होईल नक्की.
कमाल आहे माझी; कसं लगेच accept केलं मी! एरवी किती वेळ लागतो, पण लौकर समजावलं मी स्वतःला.

उलझी हुई थी मैं; सुलझ गई!

अशा काय एका रात्रीत इमोशन्स बदलणार थोडीच आहेत; आणि एकदम इंवॉल्वमेंट कमी पण नाही होणार. तसं वरवर पाहिलंस तर सगळं जसं होतं तसंच आहे.

त्यामुळे भेटत राहूच आपण. फ़क्त अर्थ बदललेला असेल.

Tuesday, 25 August 2015

निमित्त!

कारणांनिमित्त आणि कारणांशिवाय,  कामासाठी आणि सुट्टीच्या दिवशी, power packed schedule मधे वेळ काढून.. बाकी लोकांसमोर कामाचं बोलताना आणि दोघंच असताना काहीही न बोलता देखील का असेना पण या आठवड्यात भरपूरच भेटलो आपण.
मुळात तुला भेटायला आता कारण शोधायची गरज नाही. सुट्टीच्या दिवशी तर भेटलंच पाहिजे आपण, आणि एरवी  कामानंतरचा स्ट्रेस बस्टर म्हणून. शिवाय तुझ्यासाठी वेळ नाही असं कधी होत नाही.
बाकीच्या लोकांसमोर भेटायचं म्हणशील तर मला आवडतं अशी जुजबी ओळख असल्याचं नाटक करायला..जेव्हा की खरंतर मी न बोलता देखील खूप काही बोलत असते आणि तुला ते जाणवत असतं. अर्थात अनेक वेळा वाटतं की आजुबाजूची माणसं, आवाज, हालचाली, बोलणं सगळं सगळं लुप्त व्हावं काही क्षणांसाठी. पण ठिकै..असंही भेटण्यात मज्जा येते.

मंगळवारी कोर्टवर कॉम्पिटिशनला भेटलो सकाळी सकाळी आणि मैचेस ना वेळ होता म्हणून कॉफ़ी घ्यायला गेलो. मस्त होती ना कड़क वाफाळती. त्या छोटयाश्या हॉटेलमधे मिळाली झकासच.
दुसऱ्या दिवशी तुझ्या ऑफिस साठी वॉलपेपरचं डिजाईन फायनल करायला पार कसब्यात. भरदुपारी. लंचअवर मधे धावतपळत. बिनधास्त नो पार्किंग मधे गाडी लावून.
ईदच्या सुट्टीला ठरलंच होतं भेटायचं. निवांत. भरपूर वेळ. बऱ्यापैकी रश होता; आपलं खाऊन झाल्यावर तू पुढे गेलास गाडी आणायला.
डेरिओजच्या माणसानी बियरचे पैसेच लावले नाहीत. मी देखील लक्षात आणून दिलं नाही; निघाले तशीच आणि तू विचार "टीप ठेवलीस का?!"

नंतर देखील CA कड़े रिटर्न्स भरायच्या मागे असताना; थोडंसं बरं वाटत नसताना जेमतेम तासाभरासाठी का होईना पण भेटलोच आपण. कधी मी उशिरा पोचले; कधी तू खूपच लौकर येऊन थांबलास. कसं का असेना, जमवलंं न आपण!

अती झालं का? नाही न?
शिवाय आपण एकदाही भांडलो नाही बघ! सगळं अगदी गोडीत. अजूनतरी आपल्याला कंटाळा आलेला नाहीये.

मला काय वाटतं माहितीय.. " I need my space" अशा वाक्यांचा आधार घ्यायची जोपर्यन्त आपल्याला गरज पड़त नाही तोपर्यन्त असंच भेटत राहू आपण. तू म्हणालास तसंच.."things cant get better than this"


Pure Harmony

"प्लीज् बरंका"
असे "आवरा"वाल्या टोन मधले तुझे शब्द ऐकून गम्मत वाटली मला.
हे माझे शब्द आहेत. ख़ास माझे.
तू जसेच्या तसे चपखल वापरलेस. अगदी लहेज्यासकट.

"तू नेहमीच अशी टिपिकल पुणेरी पेठी बोलतेस का?"
जेमतेम ओळखीच्या दिवसात तूच विचारलं होतंस मला.

जसा काही तू ह्या गावचाच नाहीस. म्हणजे पेठी नाहीयेस पण किमान पुण्याचा तर नक्कीच आहेस ना?
 आणि हो मी अशीच बोलते. मुद्दाम टोचून बोलायचं डोक्यात नसतंच; पण सवयच आहे तशी. सरळ म्हणून काही बोलायचं नाही. आणि आजकाल तू देखील ते सहीसही उचललं आहेस. तुझ्या नकळत तू माझ्यासारखं बोलायला लागला आहेस. झेपत नसताना पण कुठले कुठले अवघड मराठी शब्द वापरतोस.
"तुझ्याबरोबर राहून बाकी काही नाही तरी माझं मराठी सुधारणार हे नक्की" हे असले आहेर देतोस वर.

तू सारखीच माझ्या "ऐक ना" ची नक्कल करतोस. शिवाय असं का विचारल्यावर "तू बोलतेसच अशी गोड आणि ठसक्यात; एकदम ओरिजिनल!" हे उत्तर मिळतं.

माझी गोष्ट काही वेगळी नाही. तुम्हारी बोली बोलने लगी हूँ मैं ! केवळ तुझे शब्दच नाहीत तर तुझाच attitude_approach. तू बोलतोस तसं सहज सोप्पं बोलते.

एरवी इतकी धार असते ना माझ्या शब्दांना. एकदम फटकळ. तोडून टाकते मी सहज. पण आता हळूहळू तुझ्यासारखं जमायला लागलं मला. बोथट होऊन जाते जेव्हा तुझ्याशी बोलते. अगदीच नरम. काळजीपूर्वकच म्हण ना.

संगत का असर म्हणावं तर इतकेही वरचेवर भेटत नाही आपण. फोनवर बोलायच्या वेळा अगदीच कमी येतात. तरीही "संवादी" आहोत.
ख़ास माझे शब्द आता तुझेही झालेत. तसे ते तुझ्या तोंडून ऐकताना अजूनच ख़ास वाटतं.

Now we speak the same language. काही तुझे तर काही माझे शब्द. "कनेक्ट" झाल्यासारखं वाटतं. आपल्या मधे असलेले अनेक फरक तेव्हा धूसर होतात. आपल्या गाण्यांच्या आपल्या चाली बांधतो आपण. नेमके सूर जुळल्याचं समाधान.
Pure Harmony!

Monday, 17 August 2015

त्रिकोण

पिक्चर मधे दाखवलेल्या बहुतेक सगळ्या love stories ना प्रेमाचा तिसरा कोन दाखवलेला असतोच असतो.
ते दोघं एकमेकांच्या गाढ़ प्रेमात बुडलेले आणि तिसरा/ तिसरी व्यक्ति "एकतर्फी"च. तिथे सगळा emotional मामला असतो आणि "मैं तुमसे प्यार नहीं करता/ करती"
असे जीवावर येऊन सांगतात किंवा मग जीवावरच उठतात.
बरं ते खरे प्रेमिक असल्यामुळे ते समजूतदार तर असतातच; त्यामुळे आपल्या बाबतीत साहजिकच घडतं ते चिडवणं त्यांच्या बाबतीत कधीच होत नाही.

त्यांना कधी insecure वाटत नाही; एकटे पडू अशी भीती नसते; आपल्याला "skip" केलं जाईल असे भलते विचार नसतात. उलट त्या तिसऱ्या व्यक्तिबद्दल "concern" असतो.
हे असलं वागणं मला झेपतच नाही. खोटं आणि सद्गुणांचा पुतळा टाइप.

नाही नाही.. मला insecure नाही वाटत. मी काही स्वतःला skip होउ देणार नाही.
आपल्या एकत्र असण्याबद्दल
(वाटत नसले तरी) confident आहे मी.
इतकंच कशाला, कधीतरी मीच उचकवते की तुला.. तुला आठवण करुन देते.
कारण तेव्हा खेळाची सुरुवात मी करते. एखाद सेट जेमतेम खेळत असेन असा; की तू माझी सर्विस ब्रेक करतोस. गड़बड़ते मग मी. सूत्रं तुझ्या हातात गेली की तुझ्या imagination ला पंख फुटतात.
मी घट्ट धरलेल्या प्रेमाच्या #RedHotBalloon ला टाचणी लागते.

"तूच विषय काढलास बरंका"
असं म्हणून तू मोकळा होतोस आणि मी पस्तावते. तेवढ़यापुरतं ते  डोळ्यासमोर येतं आणि पोटात खड्डा पडतो. सगळे तर्क वितर्क उगीचच कामाला लागतात.

त्यात तू आजकाल स्वतःहून चिडवण्याची आमंत्रणं लावून घेतोस; आणि वर मला ऐकवतोस की मी कशी sportingly घेत नाही; मलाच मस्करी कळत नाही.
"Just to add some spice" असे तुझ्यासारखे पत्थर दिल विचार नाही करता येत. सहजासहजी "हक्क"  (नीट ऐक: हक्क) सोडून द्यायची कल्पना पण घाबरवते.
एरवी असते तशी बेफ़िकीर ह्या बाबतीत का होत नाही मी? व्हायला पाहिजे, न?
"मला काssssही फरक पडत नाही" असं टेचात सांगता आलं पाहिजे. तुझ्या चिडवून घेण्याकड़े संपूर्ण दुर्लक्ष करता आलं पाहिजे.

बघते तरी; किती दिवस हे नाटक मी करू शकते ते.

Saturday, 15 August 2015

चाय डेट

फार्म हाउस वरुन परत येत होतो तेव्हाची गोष्ट. रेल्वे क्रॉसिंग लागलं वाटेत आणि चहा प्यायला थांबलो. कशी निवांत वेळ होती न. शांत, स्तब्ध उतरलेली उन्हं. "मे" मधला संध्याकाळचा वारा. मोकळा रस्ता. पोहोचायची घाई नाही. शहरापासून दूर, रोखलेल्या नजरा नाहीत.
"अमृततुल्य" जवळ थांबलो. तू जाऊन चहा आणलास.
"कॉफ़ी & कुकिज" की दिल बहलाने वाली बात नहीं थी. बस कटिंग चाय..
गाडीतच बसून चहा प्यायला.
खरोखर असं वाटत होतं की हा क्षण असाच राहावा. कसलीही मोहोर उमटलेली नाही त्यावर. कुठलेही ओढून ताणून आणलेले विषय नाहीत किंवा शांततेच्या जागा भरायला शोधलेले व्यर्थ शब्द नाहीत.
जो वेळ त्या आधी आपण एकमेकांबरोबर होतो तो देखील तेव्हा गिरवावासा वाटला नाही. तू आणलेल्या स्ट्रॉबेरीजचा वास गाडीत भरून राहिला होता आणि मला उगीचच गोड वाटत होतं. फार्म हाऊस वरुन उचललेलं पुस्तक चाळलं जरासं. वेड्यावाकड्या अक्षरात तुझं नाव लिहीलं होतं त्यावर. "बाइंडिंग करायला हवंय" असं स्वतःशीच बोलले. जेमतेम पंधरा वीस मिनिटं असू तिथे, न?


" निघायचं?"  इतकंच विचारलंस तू; केवळ अर्ध्या तासाचं अंतर जायचं होतं आता.

आपण अनेकदा आपल्या कॉफ़ी डेट्स बद्दल बोलतो.. ठरवतो. Expensive kind of.. साजेसे कपडे वगैरे घालून जातो. तिथला माहौल पकडण्यासाठी फ़ोटो तर अनेकदा काढतो.

पण मला आजकाल परत परत ही चाय-डेट आठवते. अचानक समोर आलेली.
माझी सुट्टी संपली त्यादिवशी आणि नंतर तुला देखील सलग वेळ मिळालाच नाही. अनेकदा सुचवून पाहिलं तुला पण आता स्पष्टच विचारते.. परत जाऊया त्या चाय डेट वर?

Tuesday, 11 August 2015

वाट्टेल ते.

गरम बातमी आणते मी ऑफिस मधली.. आणि भरपूर काय काय घाईत बोलत सुटते नुसती.. तेव्हा मग तू निवांत मागे टेकून गुढघ्याला मिठी घालून बसतोस.. अशा अविर्भावात की आता अर्धा तास तरी काय थांबत नाही ही..

अशी भरकटत जाते तेव्हा मी नाही मोजून मापुन बोलत. काय काय बोलत असेन तेव्हा आठवत देखील नाही नंतर.
तू पण बोलू शकतोस हवं ते. बिनधास्त.
अडखळायचं कशाला??
Embarrass तर अज्जीबात होऊ नकोस.

हवे ते..हवे तसे शब्द वापर. थेट.
खऱ्या (आणि दुसऱ्या_तिसऱ्या जे असतील त्या अर्थांसहित). नवीन अर्थ सापडेल आपल्याला. आपल्यासाठीचं secret meaning. दोघांसाठी फ़क्त.
नंतर कधीतरी आठवून आपण स्वतःशीच् हसू. काय अर्थ काढला होता! म्हणून गम्मत वाटेल.
"काहीही" वाला विचार केला असेल आपण; तेव्हा "आवश्यक" असेल तो.

शिवाय हे आत्ता कुठून अचानक डोक्यात आलं? नुकतीच ओळख होती तेव्हादेखिल "नेमकं" काय ते विचारलं होतंस तू. भीड़भाड़ न ठेवता. "Impression" काय पडेल अशी काळजी न करता.
मग आता काय दुरुस्ती होणार यापुढे?
आता सवय लावलीस तू "वाट्टेल ते बोलण्याची" आणि "ऐकण्याची".
विशेष अशा साखर पेरलेल्या शब्दांपासून " वैतागलेल्या "फकारा"पर्यन्त. भरपूर ऐकलय.

गोड शब्दात मस्का मी पण मारते आणि ड्राइव करताना कचकचित शिवी देखील येते तोंडात.
सब चलता है!
तूच म्हणतोस तसं.. be true.. be Original..

रंगत त्यातच आहे न.
आपलेच शब्द आपल्याला ऐकू येतील.
"बघ बघ तूच बोलला होतास हे" असं म्हणून नंतर भांडता येईल त्यावर.

माहितीय.. कॉलेजमधे असताना असं वाट्टेल ते बोलला असणार तू.. आणि आता भाषा एकदम "sophisticated" झालेली असणार. ते बरोबर आहे..
पण असं होणं सुद्धा अगदीच साहजिक आहे.

Believe me.. याबद्दल "असं कसं बोलला हां?" असा "गहन" विचार नाही करत बसणार मी. बिलकुलच नाही.

Monday, 10 August 2015

Playlist.

खूप कधीतरी पूर्वी जेवढ़यास तेवढं कामापुरतं भेटलो तेव्हा औपचारिकता डोक्यात ठेवून  बोलणं थांबायला हवं होतं..

टेंडर भरायची घाई असताना गाणं वगैरे सुचायची वेळच नव्हती ती.
पण झालं तसं.
कुठून कुठे आलो अशा emotional nostalgia मधे अड़कायचं नाहिये मला आत्ता.

पण परवा त्या गाण्या वरुन मी सांगायला लागले तुला.. आणि तू मात्र..
"आता तू हे सांगत बसणारेस का?"

हो; तुलाच सांगणार मी. तू ऐकलंच पाहिजेस..
"आपकी आँखोंमें क्या साहिल भी मिलते है कहीं"
हे असं काव्य वगैरे पहिल्यांदा खरं झालेलं अनुभवलं आणि ते पोचलंच पाहिजे तुझ्यापर्यन्त.
गाणं आणि मी त्याक्षणी करत असलेला विचार तुला समजलेला असतो; पण तरीही मला ते तुला "convey" करायचं असतं; शब्दात मांडायचं असतं. माझ्याच भाषेत सांगायचं तर "भारी" वाटतं मग मला खूप.

स्वप्न हे माझे तुझे अन् पापण्यांचे उम्बरे__ याचं भाषांतर "barriers of eyelashes असं केलं होतं मी.. आठवतंय ना? इतकं "उच्च" मराठी कधी कळणार तुला.. त्यापेक्षा अर्थ सांगितलेला बरा.
तेव्हाच कधीतरी मग मी "दर्द" (!) नावाची प्लेलिस्ट डिलीट करून टाकली. असं काही ऐकावंस वाटत नाही आता. दुःखी गाणी भरली होती त्यात..ऐकली की इतकं निराश वाटायचं न मला. प्रेमभंग झाल्यासारखं..उगीचच स्वतःला त्रास द्यायचा.
मस्त colorful गाणी ऐकते.. full volumn मधे..सतत गुणगुणते..
प्रत्येक गाण्याच्या प्रत्येक ओळीला संदर्भ आहे आणि तो तुझा आहे. music composer.. lyrics.. singer या माहीत असलेल्या गोष्टिंच्या पलीकडे त्या गाण्याला जो "अर्थ" आहे न; तो तुझ्यामुळे मिळाला आहे.
आसमाँ के नीचे पासून सूरज डूबा है पर्यन्त आणि तुम आ गए हो पासून गंदी बात पर्यन्त..मी सगळं तुझ्याशी "relate" करते.
मधेच emotional होऊन एक-दोन ओळी लिहून पाठवते तुला. व्यक्त होण्याचा किती छान रस्ता आहे न हा?

सजदा, आशकी, हया, तनहाई असले शब्द असुदेत किंवा आपले नेहमीचे ओळखीचे दिल..धड़कन.. दीवानगी आणि अजून काही. "उमजल्याशी कारण"!

तू तेव्हा मला फरमाईश केलेलं गाणं "आज़ जानेकी ज़िद ना करो" हे मी अजूनही "prepare" केलेलं नाही. ते गाणं सुचवायचं कारण मला कळलंच नव्हतं तेव्हा.
गाणं कधी तयार करीन माहित नाही.. पण "जानेकी ज़िद" कधीच कधीच करणार नाही.

Saturday, 1 August 2015

Till eternity

Till Eternity

कुठलेही जर-तर डोक्यात आलेच नाहीत. सगळं होणारच...ते देखील मनासारखं असं गृहीतच धरलं मी.. त्यामुळे माझ्या छोट्याश्या प्रश्नावर जेव्हा प्रतिप्रश्न आला तुझा.. तेव्हा मला हवं तसं "practical" उत्तर नव्हतंच.. 

"कधीपर्यन्त?"

माहीत नाही. Wild guess वगैरे मला नाही जमत. आणि तसा तो करायचा देखील नाहिये.. 

फ़क्त इतकंच माहितीय... की हे असंच राहिलं पाहिजे.. सगळ्या प्रश्न-उत्तरांसकट.. सर्व उन्हाळे-पावसाळे..सगळे चढ़-उतार..भांडणं.. समजावणं..

विसरायचं नाही म्हणजे सगळे सल्ले..मागितलेले.. आणि न-मागितलेले सुद्धा..तसेच राहायला हवे आहेत. सगळी अंतरं..मर्यादा आणि झुगारलेली बंधने पण तशीच राहायला हवीत. शिवाय आपण करून घेतलेल्या समजुती.. आणि हवेत बांधलेले बंगले..तसंच. 


महत्वाचं म्हणजे हे सगळं असं करायची जिम्मेदारी तू घ्यायला हवीस. 
आई म्हणते तसं.. मला काय फार माणसं जोडायला जमत नाही.. आणि जोडली गेलीच तरी टिकत तर त्याहुन नाहीत.. जी काही जवळची माणसं आहेत ती त्यांच्याच चांगुलपणामुळे..

मी विशेष प्रयत्न करत नाही आणि याची भीती वाटते मला कधी कधी.. 

तू म्हणतोस तसं टोकंच गाठते मी.. आणि काही विचार न करता सगळं संपलं असं ठरवून टाकते..
 तर..सांगायची गोष्ट म्हणजे..तू दुर्लक्ष कर अशा वेडेपणाकड़े..(जसं नेहमीच करतोस आणि वर हसतोस) आणि समजून घे..म्हणजे सहज होउन जाईल सगळं.. सोप्पं..

आधी सांगितल्या त्या गोष्टी ज़रा जास्त च serious झाल्या का? मग कॉफी आणि चिकन सॅंडविच पण तसंच राहिलं पाहिजे.. तो नाव छापलेला टी शर्ट आणि कप देखील.. सगळे सेल्फीज आणि मेसेज पण.. 

कधीपर्यन्त.. तर  तू emotional उत्तर दिलंस तेच बरोबर होतं..

Till Eternity..

Wednesday, 29 July 2015

मनघडन कहानी

मनघडन कहानी...

"Stories चांगल्या लिहिशील तू...ट्राय कर एकदा"
"खरंच??"
"हो..आत्ताच नाही का एक मनघड़न कहानी सांगितलिस तू"

मस्त निवांत सोफ्यावर पसरत क्षणात तू newsवर concentrate केलंस;
इतकं महत्वाचं बोलायचं विसरून गेले ना मी.

मला खरं वाटेल इतक्या seriously बोललास.. ते तसं नव्हतं हे कळायला जरा वेळच लागला मला..

 गंभीर अशा विषयावर बोलायचं ठरवलं होतं मी.. सुरुवात देखील केली.. आणि हे असं बोलून तू हवाच काढून टाकलिस सगळी..

तयारी भरपूर करते मी..तुझ्याशी बोलायच्या आधी.. असं बोलू..तसं बोलू.. सगळे allegations जमवून आणते बरोब्बर..justifications मागायची.. आणि काय ते clear च करायचं आज..

पण फ़क्त तुला कळायचा अवकाश.. पर्दाफ़ाश वगैरे होतो माझा..

आणि खरंच वाटायला लागतं मला.. मनघड़न कहानियाँ आहेत की काय?? स्टोरीज.. हसूच येतं नंतर.. stupidity आहे माझी.. तुझ्या मनात देखील नसतात अशा गोष्टींचे निकाल लावून मोकळी होते मी.. तू नेहमीसारखाच वागत असतोस.. prejudices माझेच असतात..  तुझ्यावर आणि त्याहुन जास्त स्वतःवर चिडून 2-3 दिवस अगदी मोजकंच बोलायचं.. फोनवर शक्य तितका परकेपणा दाखवायचा.. काहीही विचारलं की "बघ.. कसंही" हे patent उत्तर द्यायचं.. #lovelifequotes पाठवायचे..असले उद्योग करते मग मी..

आणि मग शेवटी तहाचं पांढरं निशाण पण मीच फडकवते..अगदी गुढगे टेकुन शरण वगैरे आले असले तरी तसं दाखवत नाही मी वरवर..

समजावत नाहीसच तू मला कधी..त्या फंदातच पडत नाहीस तू.. फ़क्त भरपूर हसतोस..
"कसं काय हे सगळं डोक्यात येतं ग तुझ्या?"
पटतंच एकदम.. खरंच कुठून येतं..?

कुठल्या जगात असते ना मी??
मी relationship चे मेसेज टाकते आणि तू त्या जॉइंट वेंचर साठी दिल्लीला जायच्या तयारीत.. "तो परवा असं कसं काय बोलला.." हयात मी अडकलेले असते..आणि तू club वर architect बरोबरच्या meetingमधे...
आवेशात केलेल्या सगळ्या मेसेजना हसत असशील.. आणि त्यात मी ते सगळं "कहानियाँ" type सांगायला लागले की अजूनच जास्त न?

असुदेत पण..

मनघड़नही सही.. हमारी भी एक कहानी है; ये क्या कम है??



Friday, 10 July 2015

गहन ?

अगदी typical प्रेम करायला लागले होते मी..
म्हणजे मला आठवतात आपले "(so called) initial days तेव्हा.. बिलकुल "teenage" असल्यासारखं वाटायला लागलं होतं मला
आणि बहुदा त्याच कल्पने मधे राहिले होते मी..
विसरायला झालं मला की समजून उमजुन ही relationship स्वीकारली आहे आता complaint नाही करू शकत मी
अर्थात.. complaint नाहीच... फ़क्त मला स्वतःला समजावायला थोडासा वेळ लागेल.. 
मी म्हणते न सतत तो madness कमी करायला लागेल.. तुझ्या बद्दल चा आणि अपेक्षा देखील
 Haha... i could imagine ur reaction after reading this ... watsapp wali 😵 smily...
एरवी ठीकच असते की मी..फ़क्त कधीकधी अगदी छोटयाश्या गोष्टी व्हायला पण वाट पाहायला लागते..तेव्हा मग धीर सुटतो
कळत असतं की तुझी काय चूक त्यात.. मीच अपेक्षा वाढवल्या आहेत.. तू म्हणतोस तसं मला का नाही जमत.. "lets keep it simple baby" 

i knw i knw.. its me who makes it complicated. 
इतर भरपूर कायकाय बोलतो आणि करतो की आपण.. venture capital पासून diet बद्दल आणि commitment पासून "कोकणस्थ" असल्याबद्दल..पण मग त्या काही गोष्टी पुऱ्या व्हायला इतका का वेळ लागतो.. 
कॉफीच तर प्यायची असते फ़क्त.. राहून जाते...
तुझ्या ट्रीपचे फ़ोटो...बघायचे राहिलेत अजुन..
परवा officeच्या visit ला घडलेला किस्सा.. सांगितलाच नाहिये की मी अजुन तुला.. 
आणि तू नागपुरहून आणलेली संत्राबर्फी..विसरून गेलास न द्यायची? हवीय ती मला आत्ताच्या आत्ता..
ते अरिजीतच गाणं.. तुझ्या बरोबर ऐकायचाय मला.. कधी होणार देव जाणे.. 

ह्या अशा इतक्याश्या वाटणाऱ्या गोष्टी कधीतरी मोठ्या होतात एकदम.. भरपूर काहीतरी महत्वाचं करायच्या नादात हे सगळं छोटसं राहून जातय.. complaint नाही करत मी.. फ़क्त नर्वस होते कधीकधी.. 

हे सगळे खुप "गहन" वगैरे प्रश्न नाहियेत् नक्कीच.. पण "अनुत्तरित" मात्र आहेतच..


Sunday, 14 June 2015

Origin of Writeup

its not that "blog" is "in" thing now a days.. bt the thought behind writing is simple one.. i love to write.. love to share.. 
its actually a secret dream of mine, that i will write some or the other day..
its not about writing sumthing "meaningful".. having value of "literature" kinda thing.. bt yes, it shud be worth reading.. thats an only funda.. 
posts might not be entertaining or informative one..or overburdened with minute detail, thing is it should hav that "X" factor in it ;) 

ek goshta manya karayla harkat nahi... that just coz of long long long watsapp chats.. atleast now i can again believe on myself..that i can write..such a writeups with scattered thoughts..with sum grammatical mistakes and more of smilys...yet having that X factor.. making the chat..ooopss.. sorry i should say a writeup.. worth reading... 

writing sumthing on the memories itself create a memory.. I do love reading my old diaries.. some of the letters i wrote to my besties, some of the old mails, even it includes the testimonials i wrote and i received on Orkut..  and yes, recently to read the whatsapp chats.. 
Never the less,, subject has to be interesting one and with appropriate words and smilys (cant forget use of smilys which elaborates more than 100 words).. writeup can be just Magical... 

i would love to grab on the thoughts..and its a promise to myself..  will keep on writing. 

Manasi :)