तू जेव्हा म्हणला ना, don't call me again.. पोटात खड्डा पडला माझ्या, एकतर भयंकर चीडलेला असणार तू , शिवाय काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही, कसं काय समजावणार मी तुला 😞
अजूनही खूप बोललास मला, त्याबद्दल काहीच राग नाही, साहजिक होती तुझी प्रतिक्रिया,. पण मला एकूण तुझ्या बोलण्या वरून फार शंका वाटायला लागली, की आता तुला हे नातं पुढे न्यायचं आहे की नाही ?
मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे, ते विचारलं, अनेक वेळा माफी मागितली, खात्रीपूर्वक सांगितलं की असं परत घडणार नाही, चूक झाली, एकवेळ फक्त समजून घे, .. तरी तुझ्या डोक्यात अनेक गोष्टी येत राहिलेल्या, खूप प्रश्न, आणि उत्तरं देऊनही तुझं समाधान होत नव्हतं.
एकदा वाटून गेलं की, तुला आता बास झालं आहे हे, कंटाळा आला माझा, शिवाय सतत माझ्या चुकीच्या वागण्याचा तुला वैताग आला असणार, म्हणजे माझे अनेक जुने आणि नवीन होणारे मित्र आणि माझं त्यांच्या बरोबर वागणं, तुला खटकत होतं.
हा सगळा विचार केला आणि मीच बोलले ब्रेकअप बद्दल, खरंतर त्यांनी काहीच हासिल होणार नव्हतं, फक्त एवढं वाटलं की, कदाचित हे बोलून दाखवल्या नंतर तुला निर्णय घेणं सोपं जाईल
निर्णय हा की, ब्रेकअप केल्यावर तुला मनातून सुटल्यासारखं वाटत असेल, हेच हवं होतं हे realize होईल कदाचित, ..
किंवा असंही वाटेल की ब्रेकअप हा काय पर्याय नाही, असे दोन्ही विचार करून मी ते बोलून टाकलं
शिवाय त्या दिवशी तू मला भेटायचं पण टाळलंस,, खरंच काही सकारात्मक उरलंय का आपल्यात अशी शंका यायला लागली.. .. उगीच ताणून धरतोय का ? .. इथून पुढे एकत्र भविष्य असणार आहे का ? ... तुझा विश्वास बसणार च नसेल तर ह्या क्षणी देखील खेचण्याचा काय हक्क आहे ?
पण तुझ्या पासून अलग वाटलं नाही कधीही. ब्रेकअप बद्दल मी बोलले, आणि तू ते नाकारावस असं फार वाटत होतं. त्या रात्री तर झोप च नाही मला,.. पहाटे उठून तुझ्या इथे आले, काही नाही, केवळ तुला पाहायला.. आधी मी चुपचाप तुला बघून लांबून जाणार होते.
मी कमी पडतेय हे जाणवत होतं, पण तुझ्या कडून काही येत नव्हतं, माझ्या हातात गोष्टी उरल्या नव्हत्या.
त्यानंतर परवा , जेव्हा आपण भेटलो, म्हणजे तू बोलावलंस भेटायला .. नेमकं काय झालं होतं त्या दिवशी ? तुला का वाटलं भेटावंस? आदल्या दिवशी तर नको वाटत होतं ना ? आपण तेव्हा ठरवलं, की हळूहळू positive वागायचं.. कारण खरंतर दोघांनाही relation तुटायला नकोय..
खरंच इतकं सहज तुटेल असं वाटतं? आपण दोघंही होऊ देऊ ? आपलं प्रेम इतकं कमजोर कधी झालं?
हे असलं ब्रेकअप होत नसतं बरका, जे आपण केलं, सॉरी मी केलेलं 😁
तुला एक खरं सांगू, परवा तू "reconciliation" च्या attempt बद्दल विचारलंस तेव्हा मला हुश्श झालं😬 कारण तुला स्वतःहून वाटलं हे महत्वाचं, ज्याची मी वाट बघत होते.
अशा वेळी तू फार गोड होतोस अरे, जसा इजहार करतोस ... ज्या तऱ्हेने मला मनवायचा प्रयत्न करतोस ते इतकं मोहक असतं, मी जरा उगीच च भाव खाते अशा वेळी😉 तुला कळतं का ते?
मी तुला बोलले तसं की, आपली भांडणं होतात ह्यात चांगली गोष्ट अशी आहे की आपलं बोलणं थांबत नाही, भले बाकीच्या लोकांच्या दृष्टींनी आपण खूप कीस पाडत असू एखाद्या गोष्टीचा, पण ते तसंच झालं पाहिजे, ..एखादी अप्रिय गोष्ट बोलायची मी टाळते.. मग ती मनात साचून राहते, त्यापेक्षा हे बेस्ट आहे, आपण बोलून मोकळे होतो.
एक गोष्ट नक्की कळली ह्या दिवसात परत एकदा, की तू खूप involve आहेस माझ्यात, .. जरी रोजच्या कामाच्या पसाऱ्यात घरच्या टेन्शन मध्ये ही गोष्ट चमकत नसली, तरी ती आहे.. तिची वेळ आली की ती झळाळून उठते एवढं नक्की.

No comments:
Post a Comment