बर्थडे स्पेशलच असला पाहीजे.
कौतुकाचा. मिरवण्याचा. साजरा करायचा. तोच दिवस जो की कधी संपूच नये असं वाटतं.
मी लहान असताना, आई वाढदिवसाच्या दिवशी मला औक्षण करायची. ओवाळून घ्यायचं, सगळ्यांना नमस्कार करायचा आणि मग वाढदिवसाचे म्हणून पैसे मिळायचे ते देखील मिंटीमधे टाकायला. शाळेत असताना वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला यूनिफॉर्मला सुट्टी द्यायची परवानगी होती. मग त्या दिवशी वेगळा ड्रेस घालून जायचं. की आपोआपच कळायचं सगळ्यांना. पुढे कॉलेजमधे गेल्यावर बड्डे बम्प्स मिळायला लागले, शिवाय तो केक तोंडाला फासायचा.
निवडक मित्र मैत्रिणींना पार्टी द्यायची. "कॉंट्री" काढून जमवलेल्या पैशातलं गिफ्ट मिळायचं.
ज्याचा बड्डे असतो न, त्याचे भरपूर लाड झाले पाहिजेत असं मला नेहमीच वाटतं.
"आता काय लहान आहोत का आपण?"
असे प्रश्न वाढदिवशी गैरलागू आहेत. "वय तर वाढणारच, त्यात काय आहे साजरं करण्यासारखं?"
असे उदास विचार निदान त्या दिवशी तरी करू नयेत.
मला तर अजूनही आवडेल फुगे, केक, मेणबत्या, नविन ड्रेस, फुलं, भरपूर चोकोलेट्स अशा गोष्टींनी नटलेला दिवस.
काही विशेष सरप्राइज गाठीभेटी आणि डोळ्यांच्या कडेला आलेलं पाणी. मनापासून दिलेल्या शुभेच्छा. आवडीनिवडी लक्षात ठेऊन दिलेली गिफ्ट्स. ख़ास माणसांसोबतचे ख़ास फ़ोटो; " special midnight wishes आणि त्यासाठी गुपचुप ठरवलेली sleepovers; एरवी कधीतरी होणारा दुर्मिळ फ़ोन, यादिवशी तासभर चालला पाहिजे. आजकाल ट्रेंड आहे तसा "जन्मदिन मुबारक"वाला बॅनर लागला आपल्या वॉलवर, तर काय विचारायलाच नको! भरपूर धामधूम् असली पाहिजे दिवसभर. मनासारखं आणि लक्षात राहण्याजोगं घडलं पाहिजे सगळं त्या दिवशी.
तुझ्या B'Day साठी अशीच धडपड केलीे मी आज. ते सगळं जमवताना माझा वाढदिवस आठवला. किती pampering केलंस माझं, सरप्राइजेस दिलीस; प्रचंड खुश झाले होते मी, आणि आठवून अजूनही मस्त वाटतं.
तू इतकं दिलंस, इतकं केलंस म्हणून मग मी मागे कशी राहणार, अशी स्पर्धा नाहीये. बरोबरकी तर त्याहुन नाही.
फक्त तू खुश व्हायला हवास, you should feel delighted, तुझे लाड करायचा अजून चांगला मौक़ा कुठला मिळणार!
गिफ्ट हां इतका जिव्हाळ्याचा विषय आहे न, आणि मला स्वतःला त्यात इनवॉल्व व्हायला खूप आवडतं.
असं उचलून पैसे देणं हे फार अरसिक वाटतं. पैसे देऊन स्वतःसाठी खरेदी तर तशीही करशील तू कधीही. पण मला द्यावसं वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, नै का?
आत्ताचंच पाहा, तुझ्या गिफ्टचा केव्हापासून विचार करते आहे मी. त्या निमित्तानि हजार वेळा तुझ्या आवडी-निवडीची उजळणी केली. गिफ्ट उघडल्यावर तुला काय वाटेल, आवडेल_नाही आवडेल, याची कल्पना करून पाहिली. गिफ्टस बघितल्यावर डोळे चमकतील तुझे, आणि मग तो आनंद बघितल्यावर अशी धडपड केल्याचं सार्थक वाटेल मला.
गिफ्ट तर फ़क्त निमित्त होतं, बाकी शुभेच्छा तर आहेतच आणि त्या कायमच असतील.
फ़क्त वय वाढलं नाही; तर सोबत आठवणीमधे अजून एक सुंदर वर्ष देऊन गेलं तुला. तुझ्याच शब्दात बोलायचं तर, अभी तो लाइफ शुरू हुई है !
असे कितीतरी येणारे वाढदिवस असतील यापुढे, जे की आपण एकत्र "सेलिब्रेट" करू. यादगार बनवु.
सो, दाढ़ी कुरवाळत वय वाढल्याचा जो काय विचार करत होतास; तो सोडून दे; भले आता डोकवत असेल एखादा चुकार पांढरा केस, पण बघ, अजून देखणा दिसायला लागलाएस तू!

Agadi barobar... birthday astatch pamper karnyasathi ani karavun ghenyasathi :)
ReplyDelete