पिक्चर मधे दाखवलेल्या बहुतेक सगळ्या love stories ना प्रेमाचा तिसरा कोन दाखवलेला असतोच असतो.
ते दोघं एकमेकांच्या गाढ़ प्रेमात बुडलेले आणि तिसरा/ तिसरी व्यक्ति "एकतर्फी"च. तिथे सगळा emotional मामला असतो आणि "मैं तुमसे प्यार नहीं करता/ करती"
असे जीवावर येऊन सांगतात किंवा मग जीवावरच उठतात.
बरं ते खरे प्रेमिक असल्यामुळे ते समजूतदार तर असतातच; त्यामुळे आपल्या बाबतीत साहजिकच घडतं ते चिडवणं त्यांच्या बाबतीत कधीच होत नाही.
त्यांना कधी insecure वाटत नाही; एकटे पडू अशी भीती नसते; आपल्याला "skip" केलं जाईल असे भलते विचार नसतात. उलट त्या तिसऱ्या व्यक्तिबद्दल "concern" असतो.
हे असलं वागणं मला झेपतच नाही. खोटं आणि सद्गुणांचा पुतळा टाइप.
नाही नाही.. मला insecure नाही वाटत. मी काही स्वतःला skip होउ देणार नाही.
आपल्या एकत्र असण्याबद्दल
(वाटत नसले तरी) confident आहे मी.
इतकंच कशाला, कधीतरी मीच उचकवते की तुला.. तुला आठवण करुन देते.
कारण तेव्हा खेळाची सुरुवात मी करते. एखाद सेट जेमतेम खेळत असेन असा; की तू माझी सर्विस ब्रेक करतोस. गड़बड़ते मग मी. सूत्रं तुझ्या हातात गेली की तुझ्या imagination ला पंख फुटतात.
मी घट्ट धरलेल्या प्रेमाच्या #RedHotBalloon ला टाचणी लागते.
"तूच विषय काढलास बरंका"
असं म्हणून तू मोकळा होतोस आणि मी पस्तावते. तेवढ़यापुरतं ते डोळ्यासमोर येतं आणि पोटात खड्डा पडतो. सगळे तर्क वितर्क उगीचच कामाला लागतात.
त्यात तू आजकाल स्वतःहून चिडवण्याची आमंत्रणं लावून घेतोस; आणि वर मला ऐकवतोस की मी कशी sportingly घेत नाही; मलाच मस्करी कळत नाही.
"Just to add some spice" असे तुझ्यासारखे पत्थर दिल विचार नाही करता येत. सहजासहजी "हक्क" (नीट ऐक: हक्क) सोडून द्यायची कल्पना पण घाबरवते.
एरवी असते तशी बेफ़िकीर ह्या बाबतीत का होत नाही मी? व्हायला पाहिजे, न?
"मला काssssही फरक पडत नाही" असं टेचात सांगता आलं पाहिजे. तुझ्या चिडवून घेण्याकड़े संपूर्ण दुर्लक्ष करता आलं पाहिजे.
बघते तरी; किती दिवस हे नाटक मी करू शकते ते.

No comments:
Post a Comment